मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद

जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर आळेफाटा पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आमची शाळा आहे. शाळेची स्थापना १८८३ या वर्षी झाली. आज या शाळेमध्ये पहिली ते चौथी मध्ये एकूण ११० विद्यार्थी शिकत असून एकूण चार शिक्षक आहेत. शाळेला स्वतःचा वेगळा  संगणक कक्ष आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षित करण्याचे काम केले जाते. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी ई-पद्धतीने अभ्यास सोडविण्यासाठी नियमित प्रोत्साहित केले जाते. मुख्याध्यापक : श्री. सुनील दावल ठिकेकर शिक्षकांची नावे: सौ. वृषाली दीपक कालेकर सौ. संगीता महेंद्र कुदळे सौ. मनीषा काशिनाथ इले शाळेचे गुगल लोकेशन    

आवाहन

तालुका जुन्नर जिल्हा पुणे परिसरात येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांना एकत्रित ऑनलाईन व्यासपीठ आम्ही नव्या संकेतस्थळाद्वारे उभे करत आहोत. आमच्या संस्थेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या या संकेतस्थळाचे खालील प्रमाणे काही मुख्य उद्देश आहेत. १. सर्व शाळांच्या उपक्रमांची माहिती ऑनलाइन उपलब्ध व्हावी व ती इतरांनाही समजावी. २. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जसे चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व यांना वाव मिळावा व त्या अनुषंगाने त्यांच्या कला वृद्धिंगत व्हाव्यात. ३. उपक्रमशील शाळांना व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे. ४. विविध उपक्रमांसाठी शाळांना नागरिकांकडून किंवा माजी विद्यार्थ्यांकडून मदत उपलब्ध व्हावी. ५. मराठी शाळा या सध्या चर्चेत असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहाव्यात. आपण जर मुख्याध्यापक असाल तर खालील फॉर्म भरून द्यावा. संस्थेतर्फे शाळेला परत लवकरच प्रत्यक्ष भेट देण्यात येईल . bit.ly/zpjunnar - मितू स्किलॉलॉजिस, पुणे.